'शौर्य कुणी दाखवलं आणि छाती कोण दाखवतंय' पवारांचा मोदींवर हल्लाबोल

देशाचा बदललेला मूड मोदींना समजला : शरद पवार

News18 Lokmat | Updated On: Mar 4, 2019 03:38 PM IST

'शौर्य कुणी दाखवलं आणि छाती कोण दाखवतंय' पवारांचा मोदींवर हल्लाबोल

नाशिक, 4 मार्च : येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशावर हल्ला झाला त्यावरुन राजकारण करणार नाही. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुदैवाने पंतप्रधानांनी लष्कराला मोकळीक दिली असे शरद पवार यांनी सांगितले.

जवानांनी एअर स्ट्राईक करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र सरकार याचा राजकीय फायदा घेत आहे. भाजप नेत्यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवावा असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतंय असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण करण्यासाठी वापर केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले.

निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा दुरूपयोग होत असल्याचे सांगताना शरद पवार यांनी मध्यप्रदेशात एका ठिकाणी EVM मशीनची तपासणी केली तर कोणतंही बटन दाबल्यावर कमळला मत जात होतं असं सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात तर 700 मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याचेही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपून बोललं पाहिजे असं शरद पवार म्हणाले. पंडित नेहरु, इंदिरा गांधी,राजीव गांधी यांनी देशासाठी योगदान दिलं आहे. अशा लोकांबद्दल बोलणं योग्य नाही असंही पवारांनी सांगितले.

Loading...

काय म्हणाले शरद पवार?

- जर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आलं तर हुकूमशाही येईल

- संकुचित विचार करणाऱ्यांच्या हातात देश नको

- मोदींच्या रूपानं देशात आपत्ती

- सरकारला गेल्या साडेचार वर्षात,प्रत्येक निर्णयात अपयश आलंय

- नोटबंदी फसली,कर्जमाफी फसली,शेतकरी आत्महत्या सुरूच आहे

- शेतकऱ्यांना 6 हजार नको,शेतीमालाला किंमत द्या

- सरकार 3 रुपये 17  रोज देतंय, रोजगार हमीवर काम करणाऱ्याला 350 रुपये रोज मिळतो  ही शेतकऱ्यांची थट्टा

- हे सरकार म्हणजे लबाडाच्या घरचं अवताण

- संपुर्ण शेती अर्थव्यवस्था संकटात

- राफेलची किंमत 530 कोटी

- मनमोहन सिंग सरकारनं घासाघीस करून ही किंमत ठरवली होती

- आता तेच विमान 1600 कोटीत घेतलं जातंय

- संरक्षण खात्यात खरेदीसाठी एजंट नसावा हा सरकारचा निर्णय आहे मात्र,यांनी एजंट नेमला

- सत्तेचा गैरवापर करून सत्ता राखणं हे आजचं सरकार करतंय

- 3 राज्यात भाजप पराभूत झालं, हा देशाचा मूड मोदींना समजला

VIDEO : ...जेव्हा सुप्रिया सुळेंना उचलून पती सदानंद यांनी चढल्या जेजुरीच्या पायऱ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...