जनमत सरकार विरोधात जातंय, आताच कामाला लागा- शरद पवार

आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे, उदयनराजे भोसले, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2017 03:08 PM IST

जनमत सरकार विरोधात जातंय, आताच कामाला लागा- शरद पवार

 03 ऑक्टोबर:देशातलं जनमत आज सरकार विरोधात जातंय तेव्हा कामाला लागा असा सल्ला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारणीच्या बैठकीत ते बोलत होते.

आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे, उदयनराजे भोसले, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत सरकारची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

'जीएसटी लागू केल्यानंतर आर्थिक संकट येऊ शकतं असं आक्रमक भाषण मोदींनी केलं होतं. मग महागाईला आमंत्रण देणारे निर्णय यांनी का घेतलेत?' असा सवाल शरद पवारांनी यावेळी विचारला आहे. सोशल मीडियावर अनेक खोट्या गोष्टीही पसरवल्या जातात. ग्लोबेल नीतीलाही लाजवेल अशी ही नीती आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत सरकार काय करतंय हे बघू त्यानंतर औरंगाबादला बैठक घेऊ असं शरद पवारांनी सांगितलं.

देशात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण होते आहे. आयटी क्षेत्रातल्या खूप लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागत आहे असंही पवार यांनी यावेळी सांगितलं सामान्य माणूस जिथून प्रवास करतो त्याच्या यातना कमी करण्यासाठी प्रयत्न होतं नाही. पण बुलेट ट्रेनचे प्रोजेक्ट आणले जातात असं म्हणत त्यांनी बुलेट ट्रेनच्या धोरणावर टीकाही केली. जपानमध्ये आज आर्थिक मंदी आहे आणि फास्ट ट्रेनची कारखानदारी जपानमध्ये आहे पण त्याला मार्केट नाही. तेव्हा जपान आर्थिक मंदी कमी करण्यासाठी आपल्याकडे बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट करतंय असं शरद पवारांचं म्हणणं आहे.

आता 6आणि 7 नोव्हेंबरच्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 02:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...