शरद पवारांसोबत एकत्र प्रवास करून उदयनराजेंनी दिला धक्का

शरद पवारांसोबत एकत्र प्रवास करून उदयनराजेंनी दिला धक्का

साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज अचानक थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर पुणे ते सातारा प्रवास करून सर्वांना धक्का दिला. ते सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

  • Share this:

सातारा, 04 आॅक्टोबर :  साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनी आज अचानक थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर पुणे ते सातारा प्रवास करून सर्वांना धक्का दिला. ते सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

कायम पक्षविरोधी भूमिकेमुळे उदयनराजे फार काळ पक्षात राहणार नाहीत, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. त्यात भर म्हणून विधान परिषद सभापती आणि शरद पवारांचे निकटवर्ती असलेल्या रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर असणाऱ्या टोकाच्या मतभेदांमुळे या गोष्टीला थोड्या प्रमाणात पुष्टी मिळत होती. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात असणाऱ्या उदयनराजेंची अनुपस्थिती उदयनराजे पक्षापासून लांब गेल्याचे स्पष्ट दाखवून देत होती.

परंतु आजच्या पवारांबरोबरच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 12:22 PM IST

ताज्या बातम्या