S M L

जळगावात उन्हाच्या तापमानामुळे फटाक्याच्या कंपनीत स्फोट, 2 ठार

जळगावात उन्हाच्या तापमानामुळे फटाक्यांसाठी लागणाऱ्या दारूच्या गोदामात स्फोट झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय

Sachin Salve | Updated On: May 2, 2017 06:39 PM IST

जळगावात उन्हाच्या तापमानामुळे फटाक्याच्या कंपनीत स्फोट, 2 ठार

02 मे : जळगावात उन्हाच्या तापमानामुळे फटाक्यांसाठी लागणाऱ्या दारूच्या गोदामात स्फोट झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. शिरसोली जळगाव दरम्यान प्रकाश शामलाल मिलवाणी यांच्या मालकीच्या शामाफायर फटाक्यांच्या कंपनीत हा स्फोट झाला.

जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोलीपासून एक किलोमिटर अंतरावर असलेल्या शामाफायर कंपनीत फटाक्याच्या दारुच्या स्फोटक रुममध्ये दोन मजूर काम करीत असतांना वाढच्या उन्हाच्या तापमानामुळे आज दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास रुममध्ये अचानक स्फोट झाल्याने यात मद्रास येथील हेमंत जयस्वाल (वय 45) आणि शिरसोली येथील राजेंद्र बाबुराव तायडे (वय 36) यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडून काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनास्थळी एमआयडीसी पो.स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे, डीवायएसपी सचिन सांगळे हे घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2017 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close