S M L

मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर 1 रुपया दंड द्या,शाहू महाराजांच्या आदेशाला 100वर्ष

पालकांनी आपल्या पाल्यांना म्हणजेच मुलांना जर शाळेत पाठवलं नाही तर महिन्याला एक रुपये दंड आकारला जाईल असा आदेश शंभर वर्षांपूर्वी दिला गेला होता.

Sonali Deshpande | Updated On: Sep 21, 2017 02:17 PM IST

मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर 1 रुपया दंड द्या,शाहू महाराजांच्या आदेशाला 100वर्ष

संदीप राजगोळकर, 21 सप्टेंबर, कोल्हापूर : पालकांनी आपल्या पाल्यांना म्हणजेच मुलांना जर शाळेत पाठवलं नाही तर महिन्याला एक रुपये दंड आकारला जाईल असा आदेश शंभर वर्षांपूर्वी दिला गेला होता. ऐकून नवल वाटलं ना ?  हो,असा आदेश दिला गेला होता, आणि हा आदेश दिला होता समतेची शिकवण देणारा द्रष्टा राजा अशी ओळख असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आणि तोही कोल्हापूरमध्ये.

21 सप्टेबर 1917 या दिवशी म्हणजेच आजपासून मागे शंभर वर्षांपूर्वी मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा राजर्षी शाहू महाराजांनी लागू केला होता आणि याच कायद्याला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत , त्यामुळे शिक्षणाशिवाय समाजाला पर्याय नाही आणि संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करावं हा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केला होता हेच आजही स्पष्ट होतंय.

राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळी प्राथमिक शिक्षणावर 6.5 टक्के खर्च केला होता. आज एवढा खर्च शिक्षणावर होताना दिसत नाही. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वी राजर्षींनी शिक्षणासाठी किती प्रयत्न केले हेच यावरून दिसून येतं. करवीर संस्थानातल्या आपल्या सगळ्या प्रजेला लिहिता-वाचता यावं,  त्यांची स्थिती सुधारावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी हा मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा त्याकाळी लागू केला होता.सात ते चौदा वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण दिले जावे हा आग्रह महाराजांचा होता आणि जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना दर महिन्याला दंड करण्यात येईल असाही आदेश महाराजांनी काढला होता आणि विशेष म्हणजे याबाबतची एक नोटीसही पालकांना पाठवली जायची आणि तीस दिवसांच्या आत दंड भरला नाही तर लँड रेव्हेन्यू नियमाप्रमाणे हा दंड वसूल केला जायचा आणि राजर्षी शाहु महाराजांच्या याच आदेशाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेत हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 02:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close