दिल्लीतील भेटीनंतर राणे आणि शहा एकाच विमानातून मुंबईकडे रवाना !

अमित शहांसोबतची भैट संपवून नारायण राणे मुंबईकडे रवाना झालेत. अमित शहा यांच्या घरी झालेल्या या बैठकीत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, राणेंनी फक्त अमित शहा यांना सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलंय तर सूत्रांच्या माहितीनुसार माझ्यासोबत 25 आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी अमित शहांना दिलंय. त्यामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2017 11:50 PM IST

दिल्लीतील भेटीनंतर राणे आणि शहा एकाच विमानातून मुंबईकडे रवाना !

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर :  अमित शहांसोबतची भैट संपवून नारायण राणे मुंबईकडे रवाना झालेत. अमित शहा यांच्या घरी झालेल्या या बैठकीत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, राणेंनी फक्त अमित शहा यांना सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण दिलंय, बाकी या बैठकीत दुसरी कुठलीही चर्चा झाली नाही, असा दावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. तर या बैठकीनंतर नारायण राणेंनी पत्रकारांना भेटणं टाळलं आणि ते थेट मुंबईकडे रवाना झालेत. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार नारायण राणे आणि अमित शहा एकाच विमानाने मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार माझ्यासोबत 25 आमदार येतील, असं आश्वासन राणेंनी अमित शहांना दिलंय. त्यामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय. अर्थात अमित शहांना भेटण्याआधी नारायण राणे दिल्लीत मुख्यमंत्र्यांनाही भेटले. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही भेटले त्यानंतरच चंद्रकांत पाटील राणेंना घेऊन अमित शहांच्या घरी गेले. तत्पूर्वी अमित शहा देखील भाजपतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या गाण्यांचा प्रोग्राम संपवून घरी पोहोचले तेव्हा राणे आणि चंद्रकांत पाटील अगोदरच त्यांच्या घरी जाऊन बसले होते.

तत्पूर्वी भाजप मुख्यालयात पत्रकारांनी अमित शहांना राणेंना कधी भेटणार ? असं विचारलं असता त्यांनी आता मी गाणे ऐकायला चाललो आहे. असं बुचकाळ्यात टाकणारं उत्तर दिलं होतं त्यामुळे राणेंना भाजप प्रवेशासाठी वेटिंगवर ठेऊ इच्छितं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण अखेर गाण्यांचा प्रोग्राम संपवून अमित शहा एकदाचे घरी पोहोचले आणि या तिघांमध्ये बैठक सुरू झाली.

दरम्यान, भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी संपल्यानंतर अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेलेल्या नारायण राणेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहबे दानवेंची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये नेमकं काय बोलणं हे समजू शकलं नाही पण त्यानंतर चंद्रकांत पाटील नारायण राणेंना घेऊन अमित शहांच्या घरी गेलेत. दरम्यान, आज मुख्यमंत्री आणि नितीन गडकरी यांचीही भेट झाली.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 10:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...