VIDEO :पाचवीतल्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, ग्रामस्थांचा बेदम चोप

VIDEO :पाचवीतल्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग, ग्रामस्थांचा बेदम चोप

सुनील कांबळे या शिक्षकाने 5 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. यानंतर गावामध्ये संतापाची लाट पसरली.

  • Share this:

कोल्हापूर, 3 नोव्हेंबर : शिक्षकाने शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बोळावी इथं घडली आहे. सुनील कांबळे असं या नराधम शिक्षकाच नावं आहे.

सुनील कांबळे या शिक्षकाने 5 वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली. यानंतर गावामध्ये संतापाची लाट पसरली. ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेत या आरोपी शिक्षकाला बेदम चोप दिला आहे.  या मारहाणीत सुनील कांबळे जखमी झाला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर सुनील कांबळे याच्या विरोधात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच याप्रकरणी त्याला अटकदेखील करण्यात आली आहे.

सुनील कांबळे याची कारकीर्द वादग्रस्त असल्याचं येथील नागरिक सांगतात. अशा प्रकारे जर शिक्षकांकडूनच विद्यार्थीनींवर अत्याचार होणार असतील तर मुलींच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2018 10:24 AM IST

ताज्या बातम्या