पुजारीच झाला अत्याचारी, गोव्याच्या मंगेशी देवस्थानात 2 युवतींवर विनयभंग

पुजारीच झाला अत्याचारी, गोव्याच्या मंगेशी देवस्थानात 2 युवतींवर विनयभंग

या देवस्थानच्या पुजाऱ्याने मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या दोन युवतींवर लैंगिक अत्याचार केल्याची लेखी तक्रार या युवतीनी देवस्थान समितिकडे केली आहे.

  • Share this:

गोवा, 19 जुलै : गोव्याचं मंगेशी देवस्थान वादात सापडलं आहे. या देवस्थानच्या पुजाऱ्याने मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या दोन युवतींवर लैंगिक अत्याचार केल्याची लेखी तक्रार या युवतीनी देवस्थान समितिकडे केली आहे. 14 जूनला एका युवतीच्या बाबतीत तर 22 जूनला दुसऱ्या युवतीच्या  बाबतीतल्या या दोन घटना असून मंदिरातलं CCTV फुटेज तपासून पुजारी धनंजय भावे याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आलीय.

दूध बंद आंदोलन 'उकळलं', आज राज्यभरात चक्काजाम

यानंतर 22 जूनच्या तक्रारीला उत्तर देताना पुजारी धनंजय भावे यांना प्रथमदर्शनी दोषी ठरवण्यासाठी समितिकडे कोणताच पुरावा आला नसल्याचं देवस्थान समितिने म्हटलं आहे. तरीही याबाबतीत तक्रारदार युवतीने सक्षम न्याय प्राधिकरणाकडे दाद मागून त्यांच्या चौकशीत पुजारी दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई करू असं लेखी आश्वासन दिलं आहे.

पुजारी धनंजय भावे याने जबरदस्तीने मिठी मारून चुंबन घेतले आणि जबरदस्ती केली अशा या दोन तक्रारी करण्यात आल्या आहे. धनंजय यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत.

हेही वाचा...

PHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक !

संभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी?

VIDEO : माॅडेलचा मुलीला स्तनपान करत रॅम्पवॉक !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 10:14 AM IST

ताज्या बातम्या