S M L

औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

प्रोझोन मॅालमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या दोन स्पामध्ये ग्राहकांना मुली पुरवल्या जात होत्या.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 8, 2017 10:52 AM IST

औरंगाबादच्या प्रोझोन मॉलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

08 डिसेंबर: औरंगाबादमधील सर्वात मोठ्या प्रोझोन मॅालमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा शहर पोलीसांनी पर्दाफाश केलाय. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 12 परदेशी मुली आणि तीन ग्राहक आढळून आले आहेत.

प्रोझोन मॅालमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या दोन स्पामध्ये ग्राहकांना मुली पुरवल्या जात होत्या. ग्राहकांकडून स्पा आणि मुलींसाठी 13 हजार रूपयांची आकारणी केली जात होती. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. या दोन्ही स्पांचा मालक एकच असून तो मुंबईचा आहे. धाडीत पकडल्या गेलेल्या मुली या भारतामध्ये टुरिस्ट व्हिजावर आलेल्या आहेत. आणि त्यांनी औरंगाबाद पोलिसांकडे आपल्या अस्तित्वाची नोंदणीसुध्दा केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 10:52 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close