औरंगाबादेत उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन दलाल अटकेत

औरंगाबादेत उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन दलाल अटकेत

सातारा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. द्वारकदास नगरात छुप्या पद्धतीने देहविक्री केली जात होती.

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 4 जुलै- सातारा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. द्वारकदास नगरात छुप्या पद्धतीने देहविक्री केली जात होती. पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने सापळा रचून या प्रकरणाचा भंडाफोड केला. दोन तरुणींसह आणि दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, द्वारकदासनगरात शेजारी-शेजारी असलेल्या दोन रो-हाऊसमध्ये मुंबई येथील तरुणींना औरंगाबादेत बोलवून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सातारा आणि पुंडलीकनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. पंटरच्या मदतीने सापळा रचून तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे या दोन दलालासह देहविक्री करणाऱ्या दोन तरुणींना अटक केली आहे. हे दोन्ही दलाल राज्यातील विविध शहरातून मुलींना औरंगाबादेत आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतल्याप्रकरणी सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल आडे यांनी दिली आहे.

मॅनेजरनेच वामन हरी पेठे ज्वेलर्सवर मारला डल्ला, 58 किलो सोने केले लंपास

शहरातील दुसऱ्या एका घटनेत वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल 58 किलो सोने चोरीला गेले. या सोन्याची किंमत तब्बल 27 कोटी 31 लाख इतकी आहे. वामन हरी पेठेच्या औरंगाबाद शाखेत हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे या चोरीप्रकरणी औरंगाबाद शाखेचा मॅनेजर अंकूर राणे यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपी अंकूर राणे याने दुकानातीस सोन्याचे दागिने चोरून ते बनावट बिल तयार करून शहरातील वेगवेगळ्या दुकानांमध्ये विकल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.

VIDEO:वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 09:45 PM IST

ताज्या बातम्या