News18 Lokmat

अलिबाग इथे सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांसह 9 जण अटकेत

अलिबाग येथील एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 5 महिलांसह 9 जण अटक केली असून 7 मुलींची सुटका करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 09:47 PM IST

अलिबाग इथे सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 महिलांसह 9 जण अटकेत

रायगड, 28 जून- अलिबाग येथील एका बंगल्यावर पोलिसांचा छापा टाकून सेक्स व ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी 5 महिलांसह 9 जण अटक केली असून 7 मुलींची सुटका करण्यात आली आहे. सध्या या मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांकडून 26 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत अंदाजे अडीच लाख रुपये आहे.

पुण्यात 49 लाख रुपयांचे कोकेन जप्त, नायजेरीयन नागरिकाला अटक

पुणे पोलीसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 49 लाख रुपये किमतीचे 488 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर आठ लाख रुपये रोकड, विदेशी मद्याच्या बाटल्या आणि होंडा सीआरव्ही कार असा एकूण 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फॉलरीन अब्दुल अजिज अन्डोई असे या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाचे नाव आहे. पुण्यातील बाणेरमध्ये तो राहात होता. बाणेर-औंध परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.

याआधी 2013 मध्ये ही या आरोपीवर अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी कारवाई झाली होती. त्यात त्याला चार वर्षे कारवासाची शिक्षा झाली होती. शिक्षा संपल्यानंतर तो पुन्हा अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरला होता. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांनी दिली आहे.

Loading...

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...