राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा, आता प्रतीक्षा पावसाची

राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे चिंता वाढली आहे. मान्सूनचा पाऊस यायला अजून उशीर आहे. त्यामुळेच राज्यभरातल्या नागरिकांना याच पाणीसाठ्यावर तहान भागवावी लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 05:36 PM IST

राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा, आता प्रतीक्षा पावसाची

प्रवीण मुधोळकर

नागपूर, 4 जून : राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 7 टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे चिंता वाढली आहे. मान्सूनचा पाऊस यायला अजून उशीर आहे. त्यामुळेच राज्यभरातल्या नागरिकांना याच पाणीसाठ्यावर तहान भागवावी लागणार आहे.

सिंचन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद विभागात एक टक्क्यांपेक्षाही कमी तर नागपूर विभागात सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धक्कादायक बाब म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक प्रकल्पातला उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्क्यांवर आहे. आता चांगला पाऊस पडला तरच या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होईल.

गोसीखुर्दमध्ये शून्य टक्के

विदर्भातला गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प देशातला दुसरा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण सध्या या धरणात उपयुक्त पाणी साठा आहे शून्य टक्के. विदर्भातल्या एकूण 372 सिंचन प्रकल्पांमध्ये फक्त सहा टक्केच पाणी उपलब्ध आहे.

Loading...

पाणीसाठ्याची अशी अवस्था असताना शहरांची तहान भागविण्याचं आव्हान यंत्रणेसमोर आहे. राज्य सरकारने नागपूर शहराची तहान भागवण्यासाठी आता पेंच आणि कन्हान प्रकल्पाच्या मृत साठ्यातलं पाणी सोडायला सुरुवात केली आहे.

धरणातला गाळ तसाच

उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात हवं तसं नियोजन राज्य सरकारने केल्याचं दिसत नाही. एकीकडे धरणं कोरडी पडत असताना धरणातला गाळ काढून पाणीसाठा भविष्यासाठी वाढवता आला असता. पण यासंदर्भातही काहीही काम झालं नाही, असं सिंचन अभ्यासक प्रवीण महाजन यांचं म्हणणं आहे.

सरकारच्या या कारभारानुसार आता मान्सूनपर्यंत वाट पाहण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. त्यातच मान्सून वेळेवर आला नाही किंवा चांगला बरसला नाही तर ही स्थिती आणखी विदारक होण्याची चिन्हं आहेत.

============================================================================================

SPECIAL REPORT : शिवरायांचा वारसा, सामानगडवरील विहीर खुली केल्यानंतर 'हे' आढळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...