S M L

बिटकॉईनच्या महाघोटाळ्याचा पुणे सायबर सेलनं केला पर्दाफाश

बिटकॉईनचा देशातला सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचा पुणे सायबर सेलनं पर्दाफाश केला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 4, 2018 07:59 PM IST

बिटकॉईनच्या महाघोटाळ्याचा पुणे सायबर सेलनं केला पर्दाफाश

पुणे, ता.04 एप्रिल : बिटकॉईनचा देशातला सगळ्यात मोठ्या घोटाळ्याचा पुणे सायबर सेलनं पर्दाफाश केला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली. ‘जीबी-21’ या कंपनीच्या नावावर ही फसवणूक झाली आहे. अमित भारव्दाज असं या कंपनीच्या संस्थापकाचं नाव आहे. विविध शहरांमध्ये सेमिनार्स घेऊन लोकांना बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन अमित भारव्दाज आणि त्यांची टोळी करत होती. १८ महिन्यात एका बिटकॉईनच्या बदल्यात १.८ बिटकॉईनचा परतावा देण्याच अमिष या टोळीकडून दाखवलं जातं होतं. या अमिषाला बळी पडून हजारो लोकांनी यात कोट्यवधींची गुंतणूक केल्याची माहितीही शुक्ला यांनी दिलीय. या प्रकरणी आत्तापर्यंत 27 फसवणूकीच्या तक्रारी दाखल केल्या असून 8 हजार लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. आत्तापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात आलीय.

या आधीच केंद्र सरकार आणि विविध अर्थ संस्थांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करू नका असं आवाहन केलं होतं.

आरोपींची नावं - आकाश संचेती, काजल जितेंद्र शिंगवी, व्यास नरहरी सापा, हेमंत सुर्यवंशी, हेमंत चव्हाण, अजय जाधव, पंकज आदलाखा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 07:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close