भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, गाडी कापून मृतदेह काढले बाहेर

आनंद देशमुख यांचं कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं. त्यावेळी बंगळुरूमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 06:37 PM IST

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, गाडी कापून मृतदेह काढले बाहेर

अमोल गवांडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 06 मे : बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये स्विफ्ट कारला भीषण अपघात झाला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अंगरक्षक आनंद देशमुख यांच्या कुटुंबातील 6 जणांचा तर कार चालकाचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

आनंद देशमुख यांचं कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं. त्यावेळी बंगळुरूमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास देशमुख कुटुंबाच्या कारची एका टँकरला धडक झाली. ज्यामध्ये कुटुंबातील 6 जण तर कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात 3 पुरुष, 2 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश आहे.

समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरला कारची जोरात धडक झाल्याने या अपघातात कोणीही बचावलं नाही. तर हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृतदेह बाहेर कार कापून बाहेर काढावे लागले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताची माहिती आनंद देशमुख यांना देण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून 7 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर अपघात नेमका कसा झाला याचा तपास सध्य़ा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Loading...

दरम्यान, देवदर्शनासाठी जात असलेल्या संपूर्ण कुटुंबाचा असा अंत झाल्यामुळे देशमुख परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे.


VIDEO : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याची बोटंच तुटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 06:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...