वेगाच्या नशेने केला घात..राज्यभरात 6 ठिकाणी भीषण अपघात, 7 जणांचा बळी

आजचा दिवस हा अपघातवार ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिवसभरात झालेल्या सहा रस्ते अपघातांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 16, 2019 06:53 PM IST

वेगाच्या नशेने केला घात..राज्यभरात 6 ठिकाणी भीषण अपघात, 7 जणांचा बळी

मुंबई, 16 मे- आजचा दिवस हा अपघातवार ठरलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण दिवसभरात झालेल्या सहा रस्ते अपघातांत 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

औरंगाबाद, वर्धा, नंदूरबार, अमरावती, गोंदिया आणि येवला या भागात वेगवेगळ्या ठिकाणी हे भीषण अपघात झाले आहेत. औरंगाबादमध्ये मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झालाय. तर अशाच प्रकारे अपघात होऊन गोंदियात एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागलाय. वर्ध्यामध्ये भरधाव कारनं दोघांना चिरडल्याचा प्रकार घडलाय तर येवल्यामध्ये कंटेनर आणि कारची धडक होऊन एकाचा मृत्यू झालाय.

मोटरसायकलची समोरासमोर धडक..

पैठण-औरंगाबाद रोडवरील धनगाव फाट्यालगत दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. संतोष लाटे (रा, जळगाव), रामेश्वर भाऊसाहेब सोनवणे (रा. वाहेगाव, ता.पैठण) अशी मृतांची नावे आहेत. धडक समोरासमोर झाल्याने दोन्ही मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव कारनं दुचाकीचालकाना चिरडलं..

Loading...

वर्ध्यामध्ये भरधाव कारनं दुचाकी चालकांना चिरडल्याचा प्रकार घडलाय. पेट्रोल भरायला जाताना कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. दरम्यान अपघातानंतर पोबारा केलेल्या कारचालक आणि साथीदाराचा शोध घेतला जातोय. कार कारंजाकडून-अमरावतीकडे जात होती. दुचाकीचालक प्रवीण मानापुरे, रोशन बारइ याचा जागीच मृत्यू झाला. कारंजा घाडगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबारमध्ये 4 वाहनांमध्ये विचित्र अपघात

नंदुरबारमध्ये एनबीसी मॉल जवळच्या कल्याणेश्वर मंदिराजवळ 4 वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 7 जण जखमी झाले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने अपघातातल्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. कारण याच गाडीमुळे अपघात झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठे काय?

- औरंगाबाद - 2 मृत्यू, 2 जखमी

- वर्धा- दोघांचा मृत्यू

- नंदूरबार- 4 वाहानांचा विचित्र अपघात

- गोंदिया- एकाचा मृत्यू, 4 जखमी

- अमरावती- ट्रक आणि टँकरचा अपघात

- येवला- कंटेनर आणि कारची धडक


VIDEO : बापरे! उपचार सुरू असताना तोंडातच झाला स्फोट, महिला जागीच ठार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2019 06:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...