शाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...

शाळेसोबत वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी गेली आणि...

१४ वर्षांची ही मुलगी शाळेकडून वृद्धश्रामाला भेट देण्यासाठी गेली आणि आपली सख्खी आजी भेटल्याने तीच्या अश्रूंचा बांध फुटला.

  • Share this:

काल देशभरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. अनेक घरात नकोसे वाटणारे आणि उतारवयात एकटेपणाच्या पोकळीत जगत असलेले अनेक आजी-आजोबा आज वेगवेगळ्या वृद्धाश्रमात जगत आहेत. किंबहूना उरलं आयुष्य कसंबंस पुढे ढकलतायत. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रु तरंगल्याशिवाय राहणार नाही. या फोटोतली १४ वर्षांची ही मुलगी शाळेकडून वृद्धश्रामाला भेट देण्यासाठी गेली होती. अनेक आजी-आजोबांसोबत तिने संवाद झाला. अशातच एका आजीशी ती बोलत असताना तिच्या लक्षात आलं की ही आपली सख्खी आजी आहे आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मन हेलावून टाकणारे हे भावुक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि क्रिकेटर हरभजन सिंह यांनीसुद्धा हे भावुक क्षण आपल्या फेसबुक आणि टि्वटर अकाऊंटवर शेयर केले आहेत. हा फोटो 11 वर्ष जुना म्हणजेच 2007 मध्ये काढला गेलाय. जीला पाहण्यासाठी डोळे आतुर होते, प्रत्यक्षात ती समोर दिसताच दोघींच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव या फोटोमधून ओतप्रोत झळकताहेत.

ज्यानं हा फोटो काढलाय तो अहमदाबादचा राहणारा एक पत्रकार आहे. 12 सितंबर 2007 ला त्याचा वाढदिवस होता. मोठ्या आनंदात तो घरातून निघाला असताना त्याला मणिनगरच्या जीएनसी स्कूलमधून फोन आला. तो कॉल शाळेच्या प्रिंसिपल रीटा पंड्या यांचा होता. त्या शाळेतल्या मुलांना घेऊन वृद्धाश्रमाच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. शाळेचा हा ईव्हेंट तुम्ही कव्हर कराल का ? अशी विनंती प्रिंसिपल मॅडमने त्याला केली. लगेच त्याने हो म्हटले आणि घोडासर या भागातील मणिलाल गांधी वृद्धाश्रम गाठले.

त्याठिकाणी एकीकडे शाळेतली मुलं आणि दुसरीकडे वृद्धाश्रमातले ज्येष्ठ नागरीक बसले होते. मुलांनी आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र बसावं असा आग्रह त्याने धरला. लगेच सर्व मुलं उभी राहिली. पण, त्याचवेळेस एक चिमुकली वृद्धाश्रमातल्या एका महिलेकडे पाहून अचानक रडायला लागली. तीने तीच्या सख्ख्या आजीला समोर बसलेले पाहिले आणि धावत जाऊन तीने तीला मिठी मारली. आणि त्याच क्षणी मी हा भावुक क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असे तो सांगतो. हा सर्व प्रकार पाहून सर्वजण अचंबित झाले. प्रिंसिपल मॅडमने विचारताच 'ही माझी बा आहे...' असे म्हणत ती चिमुकली आपल्या आजीच्या कुशीत शिरली. या वेळेला दोघिंनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 07:25 PM IST

ताज्या बातम्या