शेती 10 एकर, तूर विकली ४७४ क्विंटल ; तूर व्यापाऱ्याची पोलखोल

तूर खरेदीत घोटाळा झाल्याचं सरकारनंच कबुल केलंय. या घोटाळ्याची व्याप्ती चारशे कोटींच्याही वर असल्याचं सांगण्यात येतंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 2, 2017 10:59 PM IST

शेती 10 एकर, तूर विकली ४७४ क्विंटल ; तूर व्यापाऱ्याची पोलखोल

प्रफुल्ल खंडारे,शेगाव

02 मे : तूर खरेदीत घोटाळा झाल्याचं सरकारनंच कबुल केलंय. या घोटाळ्याची व्याप्ती चारशे कोटींच्याही वर असल्याचं सांगण्यात येतंय. तुरीत गोलमाल करणाऱ्या एका व्यापाऱ्याची ही पोलखोल....

निलेश राठी शेगाव नाफेड केंद्राचे संचालक...त्यांच्या बंधू आणि आईच्या नावावर ४७४ क्विंटल तूर विकण्यात आलीये. ४७४ क्विंटल तुरीच उत्पादन घेणाऱ्या या प्रगतीशील शेतकऱ्याचे बंधू जगदीश राठी यांना आम्ही गाठलं. म्हटलं जरा फॉर्म्युला जाणून घेऊ या भरघोस उत्पन्नाचा. पण ते काही त्यांचं सिक्रेट सांगायला तयार होईना.

आता राठी बोलायला तयार नाही म्हटल्यावर, आम्ही इतकं भरघोस उत्पन्न देणार शेतचं शोधलं. आयबीएन-लोकमतची टीम मग थेट पोहचली राठींच्या शेतात. पण तिथं पोहचल्यावर वेगळीची माहिती कळली.

राठी मंडळीनं तूर विकली ४७७ क्विंटल, जमीन दाखवली १० एकर, म्हणजे एकरी तुरीचं उत्पन्न झालं ४७ क्विंटल...इतकं विक्रमी उत्पन्न् घेऊनही, नाफेड म्हणा, सरकार म्हणा कुणाचही या आधुनिक शेतकऱ्याकडे लक्ष गेल नाही. इतकं विक्रमी उत्पन्न घेता येईल का म्हणून तत्रांचही मत जाणून घेतलं.

Loading...

४७४ क्विंटल तूर एकाच कुटुंबातून विकल्या जाते आणि नाफेड दखलही घेत नाही. आणि जाब विचारल्यावर तेच ठरलेलं उत्तर.

मुख्यमंत्री म्हणतायत तूर खरेदीत चारशे कोटींचा घोटाळा झाला. पण निलेश राठींचं प्रातिनिधीक उदाहरण बघता हा घोटाळा किती तरी मोठा वाटतोय. नाफेडचे अधिकारी, गलेलठ्ठ व्यापारी तुरीच्या धंद्यात उखळ पांढ करुन घेतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 08:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...