पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी

या निवडणुकीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 09:48 AM IST

पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर,राजकारण्यांच्या नातेवाईंकांची सरशी

28 नोव्हेंबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट)निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये. राजकारण्यांच्या नातेवाईकांनी या निवडणुकीत विजयी मिळवलाय.

व्यस्थापनाच्या प्रतिनिधीपदांच्या उमेदवारांची मतमोजणी पूर्ण झालीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावाने लढवलेल्या विद्यापीठ एकता पॅनलला अपेक्षित यश मिळू शकल नाही आहेत. व्यवस्थापन प्रतिनिधी पदांच्या जागेवर विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत.

विद्यापीठ प्रगती पॅनलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले. आतापर्यंतच्या मतमोजणीत ५६ मतं घेऊन सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मतं घेऊन विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांनीही अधीसभा पदवीधरची निवडणूक लढवलीये रात्री उशिरा आलेल्या निकालात प्रसेनजीत यांचा चौथ्या फेरीअखेर मोठ्या संघर्षानंतर विजय झालाय. या मतमोजणीत विद्यापीठ प्रगती पॅनलची सरशी झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...