'वर्षा'वर होणार लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं

'वर्षा'वर होणार लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं

लोकसभा निवडणुकीकरता आता शिवसेना - भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे.

  • Share this:

मुंबई, विवेक कुलकर्णी 26 मार्च : लोकसभा निवडणुकीकरता शिवसेना - भाजपनं कोल्हापुरातून प्रचारचा नारळ फोडल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. शिवसेना - भाजपचे मुख्य पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार असून राजकीय रणनितीवर चर्चा होणार आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीकरता प्रचार करताना कोणत्या मुद्यांवर भर असेल आणि प्रचाराची दिशा काय असेल यावर देखील चर्चा होणार आहे. राज्यात 45 जागा जिंकण्याचा निर्धार शिवसेना - भाजप युतीनं केला आहे. सध्या दोन्ही पक्ष प्रचारावर देखील भर देत आहेत. यापूर्वी देखील युतीची घोषणा झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 'डिनर डिप्लोमसी'चं आयोजन करत दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये असलेली नाराजी दूर केली होती. त्यानंतर आता वर्षावर पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून आगामी निवडणुकीकरता रणनितीवर चर्चा होणार आहे.


लोकसभा 2019: नितीन गडकरींच्या संपत्तीत 140 टक्क्यांनी वाढ!


सात टप्प्यांमध्ये निवडणूक

लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीचं अखेर रविवारी बिगुल वाजलं. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली असून देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहेत. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. 3 जून रोजी 16 व्या लोकसभेची मुदत संपत असून त्यापूर्वी नवं सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे.

निवडणुकांच वेळापत्रक घोषीत झाल्यावर लगेच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या चारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्षांना करणं बंधन कारक आहे. EVM नेच मतदान होणार असून यावेळी मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त VVPAT मशिन्स लावण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.


राहुल गांधी नव्हे तर 'या' दोघांची आहे प्रत्येकाला 72 हजार देण्याची आयडिया


मतदारसंघनिहाय एकूण मतदारांची संख्या

नंदूरबार-18 लाख 50 हजार, धुळे-18 लाख 74 हजार, जळगाव-19 लाख 10 हजार, रावेर-17 लाख 60 हजार, बुलढाणा-17 लाख 46 हजार, अकोला-18 लाख 54 हजार, अमरावती-18 लाख 12 हजार, वर्धा-17 लाख 23 हजार, रामटेक-18 लाख 97 हजार, भंडारा-गोंदिया-17 लाख 91 हजार, गडचिरोली-चिमूर-15 लाख 68 हजार, चंद्रपूर-18 लाख 90 हजार, यवतमाळ-वाशिम-18 लाख 90 हजार, हिंगोली-17 लाख 16 हजार, नांदेड-17 लाख, परभणी-19 लाख 70 हजार,

जालना-18 लाख 43 हजार, औरंगाबाद-18 लाख 57 हजार, दिंडोरी-17 लाख, नाशिक-18 लाख 51 हजार, पालघर-18 लाख 13 हजार, भिवंडी-18 लाख 58 हजार, कल्याण-19 लाख 27 हजार, रायगड-16 लाख 37 हजार, अहमदनगर-18 लाख 31 हजार, शिर्डी-15 लाख 61 हजार, बीड-20 लाख 28 हजार, उस्मानाबाद-18 लाख 71 हजार, लातूर-18 लाख 60 हजार, सोलापूर-18 लाख 20 हजार, माढा-18 लाख 86 हजार, सांगली-17 लाख 92 हजार, सातारा-18 लाख 23 हजार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-14 लाख 40 हजार, कोल्हापूर-18 लाख 68 हजार आणि हातकणंगले-17 लाख 65 हजार.


SPECIAL REPORT: असं आहे हसीना पारकरचं घर; होणार लिलाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 09:49 AM IST

ताज्या बातम्या