मोहरम यात्रा शेवटची ठरली, सेल्फीच्या नादात बोट उलटून दोन मुलांचा मृत्यू

मोहरम यात्रा शेवटची ठरली, सेल्फीच्या नादात बोट उलटून दोन मुलांचा मृत्यू

आदीलाबाद येथील काही तरुण मोहरम यात्रेच्या निमित्याने राजूर गोटा येथे दर्शनासाठी आले होते.

  • Share this:

भास्कर मेहरे, यवतमाळ, 20 सप्टेंबर :- पैनगंगा नदीत बोटीवर बसून सेल्फी काढत असतांना बोट पाण्यात उलटल्याने दोघा मुलांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला तर एक जण गंभीर आहे. ही घटना झरी जमनी तालुक्यातील राजूर गोटा येथे घडली.

शेख अर्षद वय 14, शेख सुफीर सिराज 16, मृतकाची नाव असून सय्यद उमेद हा गंभीर आहे.

आदीलाबाद येथील काही तरुण मोहरम यात्रेच्या निमित्याने राजूर गोटा येथे दर्शनासाठी आले होते. त्यापैकी 5 जण सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अंघोळीसाठी पैनगंगा नदीच्या पात्रात उतरले. तेव्हा नदी काठावर असलेल्या बोटीमध्ये बसून ते नदी पात्राच्या मध्य भागी गेले आणि त्याठिकाणी बोटीतूनच सेल्फी काढत असतांना बोटीचा तोल गेला. त्यामुळे बोट पाण्यात पलटी झाली तेव्हा 5 ही जण पाण्यात बुडाले.

तेव्हा त्यांनी आरडा ओरडा केला. काही लोकांच्या मदतीने दोघे पाण्यातून बाहेर आले मात्र तीन जण खोल पाण्यात गेल्यामुळे त्यांना काढता आले नाही. त्यामुळे शेख हर्षद आणि शेख सुफीर सिराज या दोघांचा मृत्यू झाला तर सय्यद उमेद हा गंभीर आहे. त्याच्यावर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

=============================================================================

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 05:01 PM IST

ताज्या बातम्या