नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढणाऱ्या या कॅमेऱ्याऐवजी आणखी काही असतं तर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळ्यात होते. त्यासाठी त्यांचं विमान जळगावात उतरलं गेलं. तेव्हा विमानतळाच्या एका भिंतीमधून स्थानिकांनी हा व्हिडिओ शूट केला.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 11:24 AM IST

नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ काढणाऱ्या या कॅमेऱ्याऐवजी आणखी काही असतं तर?

धुळे, 17 फेब्रुवारी : जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये  भारताने देशाच्या सुरक्षेसाठी लढणारे सीआरपीएफचे 42 जवान गमावले आहे. पण महाराष्ट्रात मात्र आपल्या पोलिसांचा कारभार काही वेळा किती गलथान असू शकतो, याचं एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी धुळ्यात होते. त्यासाठी त्यांचं विमान जळगावात उतरलं गेलं. तेव्हा विमानतळाच्या एका भिंतीमधून स्थानिकांनी हा व्हिडिओ शूट केला. आम्हाला इथे कोणतीही चुकीची शक्यता वर्तवायची नाही आहे. पण, जर कॅमेऱ्याच्या ऐवजी इथे आणखी काही असतं, तर काय अनर्थ ओढावला असता ?

मोदींच्या आगमनासाठी विमानतळाचा कानाकोपरा पिंजून काढला, असा दावा जळगाव पोलिसांनी केला. मग, हा व्हिडिओ स्थानिकांनी काढलाच कसा? हा मोठा सवाल आहे.

शोकसभेच्या परवानगीसाठी गेलेल्या CRPF जवानाला पोलिसांची बेदम मारहाण

बारामती तालुका पोलिसांनी सीआरपीएफ जवानाला मारहाण केली. पोलिसांनी वर्दीवरील्या जवानाला बेड्या ठोकल्या आणि बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. शोकसभेसाठी परवानगी घेण्यासाठी गेलेल्या जवानाला पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण करण्यात आली. अशोक इंगवले या जवानाला पोलिसांनी मारहाण केली.

Loading...

CRPF जवानाला मारहाण प्रकरणी अजित पवार म्हणाले...

पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या शोकसभेची परवानगी घेण्यासाठी गेलेल्या सीआरपीएफ जवान अशोक इंगवले याला बारामती तालुका पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच मारहाण केली. यावर बोलताना अजित पवार बारामती पोलिसांचा समाचार घेतला. ''जे जवान आपलं रक्षण करताहेत, त्याच जवानांना पोलीस बेदम मारहाण करताहेत. अधिकाराचा गैरवापर करण्याचा हक्क यांना दिला कुणी?'' असा प्रश्न विचारत, कायदा आणि सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याचं ते म्हणाले. बारामतीत पार पडलेल्या एका सभेत ते बोलत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...