सुरक्षारक्षकाचा 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाची काढली विवस्त्र धिंड

विरारमध्ये सुरक्षारक्षकानेच 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहानी असे नराधमाचे नाव असून संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन त्याची विवस्त्र धिंड काढली.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 06:54 PM IST

सुरक्षारक्षकाचा 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, नराधमाची काढली विवस्त्र धिंड

मुंबई, 15 जुलै- विरारमध्ये सुरक्षारक्षकानेच 6 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहानी असे नराधमाचे नाव असून संतप्त नागरिकांनी त्याला बेदम चोप देऊन त्याची विवस्त्र धिंड काढली. नंतर त्याला अर्नाळा सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेली माहिती अशी की, नराधम हा पीडित बालिकेच्या बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. मुलीने याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. मात्र, त्यानंतर तो फरार होता. स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेऊन आता त्याची विवस्र धिंड काढली. त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

टीव्ही पाहण्यासाठी गेलेल्या भाचीवर चुलत मामानेच बलात्कार

मामा आणि भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना भिवंडी शहरात घडली आहे. नराधम मामानेच सहा वर्षीय भाचीवर बलात्कार केला आहे. नराधम मामाला पोलिसांनी अटक केली आहे. अरशद खान ( वय-22, रा.अप्सरा टॉकीज, नवी वस्ती) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित चिमुरडी तिच्या आईच्या मावशीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली होती. सहा वर्षीय चिमुरडीवर चुलत मामानेच बलात्कार केल्याची घटना शहरातील नवी वस्ती येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात नराधम मावस भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Loading...

VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...