राज्यात अतिवृष्टीची शक्यता; कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अतिवृष्टीची शक्यता; कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

संभाव्य अतिवृष्टी झाल्यास खरीपाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतीमाल आण पिकाच्य सुरक्षिततेला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे असं आव्हान पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

  • Share this:

मुंबई,04 ऑक्टोबर: राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात ५ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची चिंता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य मालाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी पत्रकार परिषदेत केलं.

संभाव्य अतिवृष्टी झाल्यास खरीपाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे शेतीमाल आण पिकाच्य सुरक्षिततेला शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे असं आव्हान पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे. कृषिमंत्री म्हणाले की, अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिक उत्पादनाचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कापणीयोग्य शेतमालास फटका बसू शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमालाची सुरक्षिच ठिकाणी साठवणूक करावी. तसंच विक्रीच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणलेला शेतमाल देखील व्यवस्थित झाकून ठेवावा.तसंच ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी स्वत:च्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ थांबू नये अशी सूचनाही करण्यात आली आहे.

दरम्यान गेले तीन चार दिवस विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्गात भातपिकाचं मोठ नुकसान झालंय. अनेक घरांना बसलेल्या विजेच्या धक्क्यांमुळे इलेक्ट्रॉनिक्स घरगुती उपकरणही जळून गेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 08:51 AM IST

ताज्या बातम्या