News18 Lokmat

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यााची सुरूवात

या टप्प्यामध्ये 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवड करून राज्य 33 टक्के वन आच्छादित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 09:05 PM IST

राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यााची सुरूवात

मुंबई, 17 सप्टेंबर: महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्लँटेशन कॉनक्लेव्ह 2017 या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात आज विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते झाली आहे. पहिल्या टप्प्यात जुलै 2017 मध्ये 5.43 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती.

आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या दुसऱ्या टप्प्याची सुरूवात झाली. या टप्प्यामध्ये 2019 पर्यंत 50 कोटी वृक्ष लागवड करून राज्य 33 टक्के वन आच्छादित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आज या मोहिमेच्या आणि इतर संबंधित विषयाचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मान्यवारांच्या उपस्थितीत केले गेले. यामध्ये राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सद्गुरू जग्गी वासुदेव, सचिन तेंडुलकर, मंत्री पंकजा मुंडे आदी मान्यवर सहभागी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 09:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...