कोल्हापुरात देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच तिरंगा झेंड्याचं लोकार्पण

कोल्हापुरात देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच तिरंगा झेंड्याचं लोकार्पण

देशातला दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उचं तिरंगा झेंड्याचं लोकार्पण कोल्हापूरमध्ये करण्यात आलंय.

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

01 मे : जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरचं नावं आता पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर अधोरेखित झालंय. कारण देशातला दुसऱ्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उचं तिरंगा झेंड्याचं लोकार्पण कोल्हापूरमध्ये करण्यात आलंय.

303 फूट उंचीच्या या ध्वजस्तंभाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता अक्षय कुमार आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. गेल्या 6 महिन्यांपासून या ध्वजस्तभांचे काम सुरू होते आणि आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं हे लोकार्पण करण्यात आलंय. मंत्री चंद्रकांत पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प तयार करण्यात आलाय.

यावेळी अक्षयकुमारला पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती. कोल्हापूरमधल्या पोलीस गार्डनमध्ये हा तिरंगा फडकत राहणार असून 24 तास हा ध्वज फडकणार आहे.

303 फूट ही ध्वजस्तंभाची उंची असून 5400 स्केअर फूट इतका तिरंगा झेंडा आहे. यापुर्वीचा देशातला सर्वात मोठा तिरंगा वाघा बॉर्डरवर आहे. त्यानंतरचा देशातला हा सर्वात उंच ध्वज असल्यामुळे आता कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 06:20 PM IST

ताज्या बातम्या