मुंबई. ता. 02 जून : बळीराजाच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यातील शेतकरी कालपासून पुन्हा 10 दिवस संपावर गेलेत. राष्ट्रीय किसान महासंघानं केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नाहीत.
राष्ट्रीय किसान महासंघानं देशभरातील २२ राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारलंय. यात मुंबई पुण्यासह सर्व शहरांचा भाजीपाला आणि दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जातोय. या संपात अनेक संघटना उतरल्यात.
दरम्यान, किसान सभा आणि विविध शेतकरी संघटनांच्या राज्यभरातील संपामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे. एपीएमसी मार्केट आणि दादर येथील भाजी मार्केट मध्ये दररोज येणार्या भाजीमाला पेक्षा आज निम्मा मालच आल्याचं विक्रेते सांगतायेत. त्यामुळे मुंबईकरांना आज भाजी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा