Elec-widget

पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींवर 10 लाखाचं बक्षीस जाहीर

पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींवर 10 लाखाचं बक्षीस जाहीर

पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे आहे, समीर गायकवाडला ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी आज कोल्हापूर पोलीस माध्यमांना काय सांगणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

  • Share this:

कोल्हापूर, 2 ऑगस्ट : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षं पूर्ण झाली आहेत. पण आजही पानसरे यांचे मारेकरी मोकाट आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत विनय पवार आणि सारंग अकोलकरांवर 10 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. अडीच वर्षांपासून दोघंही फरार आहेत. त्यांची माहिती देण्यासाठी 3 फोन नंबरही जाहीर करण्यात आलेत.

याच प्रकरणातील संशयित आरोपी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला गेल्या महिन्यात जामीनही मंजूर झालाय.

पानसरे हत्या प्रकरणामध्ये समीर गायकवाड सोबत विरेंद्र तावडे यालाही ताब्यात घेण्यात आलंय. पण या दोघांशिवाय सनातन संस्थेचे साधक विनय पवार आणि सारंग अकोलकर हे दोघं फरार आहेत. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे आहे, समीर गायकवाडला ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळी कोल्हापूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी आज कोल्हापूर पोलीस माध्यमांना काय सांगणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

उच्च न्यायालयाने यापूर्वी सारंग आणि विनय या दोघांना फरार घोषित करण्याचे आदेश कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत. त्यांच्या मागावर पोलीस असताना त्यांच्यापैकी कुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय का ?कोल्हापूरमध्ये याची चर्चा आहे. त्याचबरोबर समीर गायकवाडच्या जामीनाविरोधात कोल्हापूर पोलीस आणि पानसरे कुटुंबीय यांनी न्यायालयात धाव घेत जामीन रद्द करण्याची ही मागणी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 08:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...