S M L

नागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू

'स्क्रब टायफस' या रोगाने नागपुरात अक्षरशः थैमान घातले आहे. आतापर्यंत 55 जणांना या रोगाची लागण झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated On: Sep 5, 2018 08:50 PM IST

नागपुरात 'स्क्रब टायफस'चं थैमान, 12 जणांचा मृत्यू

नागपूर, 5 ऑगस्ट : 'स्क्रब टायफस' या रोगाने नागपुरात अक्षरशः थैमान घातले आहे. आतापर्यंत 55 जणांना या रोगाची लागण झाली असून, 12 जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यु, मलेरिया आणि स्वाईन फ्लू या आजारांनीही तोंड वर काढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर 2012 नंतर अचानक मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या ‘स्क्रब टायफस’ची लक्षणे लहान मुलांमध्येही दिसू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, नागपूरात डेंग्युचेही 274 रुग्ण पाँझिटीव्ह आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. मलेरियाचे 1398 रूग्ण दाखळ झाले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नागपूर आरोग्य विभागाचे प्रादेशिक उपसंचालक डाँ मिलिंद गणवीर यांनी न्यूज18 लोकमतला दिली.

दरम्यान, पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या या आजारांची अशी स्थिती असतांना शहरात मात्र कमालिची अस्वच्छता आहे. आशिया खंडातील क्रमांक दोनचे असा लौकिक असणाऱ्या नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरातच अस्वच्छतेन कळस गाठला आहे.

एप्रिल ते जुलै - 2018 दरम्यानची आकडेवारी

1) स्क्रब टायफस

Loading...

55 केसेस दाखल

मृत्यूसंख्या - 12

2) डेंग्यू

पॉझिटीव्ह - 274

मृत्युसंख्या - 2 (संशयित)

3) स्वाईन-फ्लू

पॉझिटीव्ह - 12

मृत्यू संख्या - 2

4) मलेरिया

1398 रूग्ण दाखल

मृत्युसंख्या - 2 (संशयित)

 

 VIDEO : 'बेटी बचाओ,बेटी भगाओ' मनसेचं आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 08:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close