S M L

नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 9 वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे.

Updated On: Jul 22, 2018 10:22 AM IST

नगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पियो आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

अहमदनगर, 22 जुलै : नगर-सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चारच्या सुमाराला स्कॉर्पियो आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये स्कॉर्पियोमधील 5 जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 9 वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील रहिवासी आहेत. प्रवासादरम्यनान त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि त्यात 5 जणांचा जीव गेला आहे.

रविवारी सकाळी 4 वाजता नगर सोलापूर महामार्गावर पाटेवाडी शिवारामध्ये हा अपघात झाला. स्कॉर्पिओ गाडी पंढरपूर येथून नेवासाकडे जात होती. तर ट्रकही सोलापूरच्या दिशेने जात होता. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. कर्जत तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

J&K : सुरक्षादलांनी कॉन्स्टेबल शहीद सलीम शहा यांच्या हत्येचा 'असा' घेतला बदला 

अपघातात मृत झालेल्या 5 जणांची नावे

1) दगडू आनंदा भणगे

Loading...
Loading...

2) बाळासाहेब लक्ष्मण माळवदे

3) रमेश भाऊसाहेब कातोरे

4) द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे

5)   हनुमान अंबादास दुसे

दरम्यान, सत्यम रमेश कातोरे या 9 वर्षाच्या जखमी मुलाल ओम हॉस्पिटल जामखेड येथे उपचारसाठी भरती करण्यात आलं आहे.

आहे.

हेही वाचा...

नववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून

'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त !

PHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2018 10:22 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close