संतापजनक : शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार

संतापजनक : शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार

सात वर्षांची मुलगी ही शाळेतून आपल्या शेतातील घराकडे परतत असताना दुचाकीने सोडून देण्याचा बहाण्याने आरोपीने तिचं अपहरण केलं आणि लैंगिक अत्याचार केला.

  • Share this:

दीपक बोरसे, धुळे 30 जुलै : शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीला पळवून नेवून तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना धुळे जिल्ह्यात घडलीय. संतप्त ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीला जबर शासन करा अशी मागणी केलीय. धुळे जिल्ह्यातील लोणखेडी गावात एका सातवर्षीय शाळकरी चिमुरडीवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनं संतापाची लाट उसळलीय.

पीडित मुलगी ही शाळेतून आपल्या शेतातील घराकडे परतत असताना दुचाकीने सोडून देण्याचा बहाण्याने आरोपीने तिचं अपहरण केलं आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नराधमाला कठोर शासन करावे अन्यथा आमच्या हवाली करावे या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्यात मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी तालुका पोलीस ठाण्याबाहेर रास्ता रोको आंदोलन करत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केलीय.

इतिहास घडला, तिहेरी तलाक यापुढे गुन्हा; ऐतिहासिक विधेयकाला राज्यसभेची मंजुरी!

सुनेशी लगट करणाऱ्या सासऱ्याला पडल्या बेड्या

मुंबई जवळच्या विरारमध्ये एका वासनांध सासऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कौटुंबीक नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने विरारमध्ये खळबळ उडालीय. हा सासरा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न करत असे. सुनेने हा प्रकार घरातल्या लोकांना सांगूनही तिला कुणी दाद देत नव्हतं. अखेर तिने हुशारी दाखवत हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि सभ्यतेचा बुरखा पांघरणाऱ्या सासऱ्याचे प्रताप उघड केले. गोविंद शेलार असं त्या नराधम सासऱ्याचं नाव आहे.

दीड कोटी खर्च करून बांधला बंधारा, एकाच पावसात वाहून गेला

विरारमध्ये सासरा आणि सुनेच्या नात्याला कलंक लावणारी लाजीवारणी घटना घडलीय. गेल्या आठवड्यापासून हा नराधम सासरा पीडित सुने सोबत लगट करीत होता. याची तक्रार तिने पतीकडे केली मात्र सर्वांनी तिला खोटे पाडले. मात्र चतुर सुनेने सासऱ्याचा पराक्रम मोबाईल मध्ये कैद करून घटनेचा पर्दाफाश केला. अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. मात्र महिलांच्या बाजूने ज्यांनी उभं राहावं अशी अपेक्षा असते अशा पोलिसांनीच हे प्रकरण घरातल्या घरात मिटवा असा सल्ला दिल्याची धक्कादाय गोष्ट सूनेने सांगितल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबात संशय व्यक्त करण्यात येतोय.

पुराच्या पाण्यात अडकली ST बस, 29 प्रवाशांची थरारक सुटका

दरम्यान विरार पोलिसांनी आरोपी गोविंद शेलार याला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास चालू आहे. महिलांवरच्या अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. महिला जर धाडसाने तक्रार करण्यासाठी पुढे येऊ लागल्या तर पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. मात्र घरच्या घरी प्रकरण मिटवा असं पोलीसच सांगत असतील तर महिलांनी कुठे जावं असा प्रश्न सामिजिक कार्यकर्ते विचारत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 10:09 PM IST

ताज्या बातम्या