S M L

VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक अपघात; विद्यार्थ्यांचा आॅटोरिक्षा उलटला

कासारवाड़ी परिसरात घडलेल्या ह्या अपघातात रिक्षातून प्रवास करणारे पाच पैकी दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Updated On: Aug 28, 2018 06:17 PM IST

VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक अपघात; विद्यार्थ्यांचा आॅटोरिक्षा उलटला

पिंपरी-चिंचवड, 28 ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड शहरातून धावणाऱ्या मेट्रोची कामे सद्या जलद गतीने सुरु आहेत. मात्र, या कामांमुळे वाहतुकदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. आज अशाच एका घटनेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारा एक रिक्षा महामेट्रोने उभारलेल्या बॅरिगेट्सला जाऊन धडकला. शहरातील कासारवाड़ी परिसरात घडलेल्या ह्या अपघाताची दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत, या अपघातात रिक्षातून प्रवास करणारे पाच पैकी दोन विद्यार्थी जखमी झाले असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातातील विद्यार्थी खड़कीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती मिळतीय.

दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या अपघाताच्या वेळी रस्त्यावर मोठी वर्दळ होती, त्यामुळे अपघातग्रस्त रिक्षाला नागरिकांनी त्वरित ऊभा करून त्या खाली दबलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे पिंपरी शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातुन होणारी अवैध वाहतूक आणि मेट्रोच्या कामाचा परिणाम अधोरेखित झाला आहे.

मेट्रोमुळे नागपुरातही तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी गमावलय जीव

नागपुरातही 14 ऑगस्ट रोजी तीन तरुणी मेट्रोच्या हलगर्जीपणाच्या शिकार ठरल्या. श्रुती बनवारी, स्नेहा अंबाडकर आणि रुचिका बोरीकर या तीनही तरुणी एलएडी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होत्या. सकाळी महाविद्यालयातून एकाच दुचाकीवर निघालेल्या या तिघी, अंबाझरी टी पॉईंट जवळ पोहचताच, समोरून रिवर्समध्ये येणाऱ्या मेट्रोच्या क्रेनने त्यांना धडक दिली. क्रेनखाली आल्याने तिघींचाही जागीच मृत्यू झाला होता.

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यावंधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2018 05:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close