निबोडी गावात शाळेचे छत कोसळून तिघांचा मृत्यू; गावकऱ्यांची कारवाईची मागणी

निबोडी गावात शाळेचे छत कोसळून तिघांचा मृत्यू;  गावकऱ्यांची कारवाईची मागणी

गावकऱ्यांनी शाळेला टाळं ठोकलं असून नगर-सोलपूर हायवेवर रस्तारोको केलं आहे.

  • Share this:

अहमदनगर,29 ऑगस्ट: अहमदनगर जिल्ह्यातील निबोडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत कोसळून ३ विद्यार्थ्यांचा काल संध्याकाळी मृत्यू झाला होता. या विरोधात कारवाई करावी म्हणून गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी शाळेला टाळं ठोकलं असून नगर-सोलपूर हायवेवर रस्तारोको केलं आहे.

गेले 2 दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याला मुसळधार पावसामुळे निंबोडी गावातील जीर्ण झालेली शाळेची इमारत काल पावसामुळे कोसळली होती. इयत्ता पाचवीच्या वर्गाचं छत कोसळल्यामुळे श्रेयस रहाणे आणि वैशाली पोटे आणि सुमित भिंगारदिवे या तीन मुलांचा मृत्यू झाला तर 32 विद्यार्थी जखमी झाले आहेत. दरम्यान जुन्या इमारतीचे सगळे वर्ग पाडण्याचीही मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2017 10:50 AM IST

ताज्या बातम्या