01 एप्रिल : राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतचे बार तसंच दारूची दुकानं आजपासून बंद होणार आहेत. हायवेपासून पाचशे मिटरच्या आतले बार, दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पण 20 हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महामार्गांपासून दारूची दुकानं 220 मीटरच्या अंतरावर असायला कोर्टाने परवानगी दिलीय.
विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये दारू पुरवली जाते त्यावरही कोर्टाने बंदी घातलीय. त्यामुळे पब, रेस्टॉरंट ह्यांनाही मोठा दणका बसलाय. राज्यात जवळपास 10 हजार हॉटेल्स बारना याचा फटका बसणार आहे.
काय स्थिती आहे 'झिंगाट' महाराष्ट्राची?
___________________________________
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी
राज्यातल्या 9 हजार 925 बार, हॉटेल्सवर परिणाम
___________________________________
एकट्या मुंबई आणि उपनगरात जवळपास 2 हजार
बार, पब, हॉटेल्सना झटका
______________________________________
मुंबईत 290, राज्यात एकूण 13 हजार 655 बार-हॉटेल्स, त्यातल्या
73 टक्के धंद्यावर निर्णयाचा परिणाम
________________________________________
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे 5 ते 6 हजार कोटी
रूपयांचा महसूल बुडणार
_______________________________________
देशात दरवर्षी दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे
जवळपास दीड लाख लोक जीव गमावतात
_________________________________________
एकट्या महाराष्ट्रात 14 हजार जण दारू
पिऊन गाडी चालवल्यानं जीवाला मुकतात
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा