S M L

27 वर्षांची सायली बनली न्यायाधीश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या JMFc (Judicial magistrate first class ) परीक्षेत तिने 14 वी रँक मिळवलीय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 27, 2018 05:02 PM IST

27 वर्षांची सायली बनली न्यायाधीश

पुणे, हलिमा कुरेशी, 27 फेब्रुवारी : पुण्यातल्या दत्तवाडी परिसरात राहणारी  सायली शेंडगे ही वयाच्या 27 व्या वर्षी न्यायाधीश बनलीय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  मे 2017 मध्ये घेण्यात आलेल्या JMFc (Judicial magistrate first class )  परीक्षेत तिने 14 वी रँक मिळवलीय.

सायली लहानपणापासून अतिशय मेहनती आहे. अभ्यासाबरोबरच वडिलांच्या कपड्यांच्या छोट्याश्या दुकानात ती मदत करायची. सायलीच्या वडिलांनी टेलरिंग करत छोट कपड्याचं दुकान सुरू केलं. या दुकानावरच तिन्ही मुलींचं शिक्षण पूर्ण केलं.मुलगी न्यायाधीश बनलीय याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतोय.

सायलीने LLMपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय. 2014 मध्ये ती ज्यूडिशीअल मॅजिस्ट्रेटची परीक्षा ( प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी)पास झाली होती. मात्र केवळ एका मार्कांने मेरिट हुकलं आणि न्यायाधीश बनण्याची संधी हुकली पण जिद्दीने अभ्यास करत मे  2017 च्या परीक्षेत सायलीने यश मिळवलं. तिच्या यशाचं सगळीकडे कौतुक होतंय.

तीनही मुली  मुलगा नाही म्हणून समाज एकीकडे टोमणा मारत असताना सायलीच्या आई वडिलांनी मात्र मुलींच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिलंच पण त्यांना मुलाप्रमाणे वाढवलं. सायलीच्या दोन मोठ्या बहिणींची लग्न झालीयत.  दोघीही कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. सायलीच्या यशाने सर्वजण आनंदी आहेत.

दत्तवाडी परिसर तसा गुन्हेगारीमुळे कुप्रसिद्ध पण अशा वातावरणात  सायली शेंडगे न्यायाधीश बनल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या नसतील तर नवल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 02:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close