दिनेश केळुस्कर,सिंधुदुर्ग,ता.4 जुलै: अत्यंत दुर्मिळ अशी स्मॉल क्लॉड जातीची पाणमांजरं सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग - तिलारी परिसरात आढळून आली आहे. या पाणमांजरांचं संवर्धन व्हावं म्हणून 'नित्यता' या संस्थेनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इथल्या शेतकऱ्यांनी नदीतली चढणीची मासेमारी बंद केलीय. अत्यंत दुर्मिळ होत चाललेला पाणमांजराची ही स्मॉल क्लॉड otter म्हणजे छोटे पंजे असलेली पाणमांजर. पश्चिम घाट आणि हिमालयातच आढळणारी. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग- तिलारी या भागात या पाणमांजराच्या अस्तित्वाचा खाणाखुणा पाहायला मिळातायत. कोकणात आढळणारी पाणमांजर स्मुद कोटेड आणि ही स्मॉल क्लॉड पाणमांजर वाचवायला प्राणिमित्र मल्हार इंदुलकर आणि त्याचे मित्र पुढे सरसावले.
विधान परिषदेच्या निवडणूकीत घोडेबाजार टळणार का?
'ढेरपोट्या' पोलिसांना विश्वास नांगरे पाटलांची खास आॅफर !
पाणमांजरांना वाचवायचं तर त्यांच खाद्य असलेल्या माशांची संख्या कमी होउन चालणार नाही. त्यामुळे प्रजनन काळात शेतात अंडी घालण्यासाठी येणारे चढणीसे मासे न मारण्याचं आवाहन त्यांनी मल्हार इंदुलकर यांनी शेतकऱ्यांना केलंय शेतकऱ्यांनीही त्याला प्रतिसाद दिला.
अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर
VIEDO हत्तींमध्येही फिफाचा फीवर!
कोकणी माणुस म्हटला तर माशावरचं त्याचं प्रेम जगजाहीर आहे.. पण तरीही पाणमांजरांसाठी तिलारीतील शेतकऱ्यांनी मासेमारी न करण्याचं ठरवलंय
पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर प्रत्येकवेळी प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा सुरवात आपल्यापासुन करावी.. आणि हेच मल्हार, मल्हारचे मित्र आणि तिलारीतील शेतकऱ्यांनी केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा