S M L

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबेंची निवड

संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी युवकांनी मोठा जल्लोष केलाय

Updated On: Sep 14, 2018 03:46 PM IST

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबेंची निवड

हरीश दिमोटे,अहमदनगर, 14 सप्टेंबर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी युवा नेते सत्यजीत तांबे यांची मोठया मताधिक्याने निवड झालीये. या निवडीने महाराष्ट्रातील युवकांमध्ये मोठे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी युवकांनी मोठा जल्लोष केलाय.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी युवकांनी पक्षसंघटनेत अधिकाधिक सक्रीय होण्यासाठी प्रत्येक राज्यात युवक काँग्रेसची निवडणूक केली यामध्ये महाराष्ट्र राज्यातून मोठया प्रमाणात युवकांची नोंदणी झाली.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी सत्यजीत तांबे,अमित झनक यांच्यासह कृणाल राऊत या निवडणूक रिंगणात होते. सत्यजीत तांबे हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे तर आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत.

मागील 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रीय आहेत. त्यांनी एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष,जि.प.सदस्य त्याच बरोबर मागील 5 वर्ष राज्याचे  युवक उपाध्यक्षपद सक्षमपणे सांभाळलं आहे. सत्यजीत तांबे हे यावेळी अध्यक्षपदी 37190 इतक्या मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवडून आले.

Loading...
Loading...

राज्यभर युवकांना सोबत घेवून काम करणारे सत्यजीत तांबे हे राज्यातील अभ्यासू,धाडसी तसंच विविध भाषांवर प्रभुत्व असणारा युवा नेता म्हणून सर्वत्र ओळखले जातात. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून काम करतांना त्यांनी वेळोवेळी पक्षाच्या भूमिका कणखरपणे मांडल्या आहेत. बुथ ते राष्ट्रीय स्तरावरील कामाचा ही तांबे यांना अनुभव आहे.    

====================================

VIDEO : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 03:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close