साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू

साताऱ्यात मुलाचा आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला, पत्नीचा मृत्यू

साताऱ्यामध्ये मुलानं आपली आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झालाय. त्यानंतर मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय.

  • Share this:

सातारा, 30 जून : साताऱ्यामध्ये मुलानं आपली आई आणि पत्नीवर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झालाय. त्यानंतर मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुलगा सागर सदाशिव घोरपडे आणि आई कल्पना हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

मुंबईत ट्रक आणि कारचा अपघात, 2 जण ठार

16 जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार, राजू शेट्टींचा इशारा

पुण्याची श्रुती ठरली `मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८`ची उपविजेती

Loading...

करफ तालुक्यातील वराडे येथील सागर घोरपडे  हे पत्नी मोहिनी, आई कल्पना यांच्यासमवेत राहत होते. त्यांच्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाद झाला. त्यातून सागरने पत्नी आणि आईला राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघींनाही चाकूने भोसकले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकू भोसकून आत्महत्येचा प्रयत्न केला.

यावेळी आरडाओरडा झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही कराड येथील रुग्णालयात हलविले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर आई आणि सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू अाहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 12:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...