काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (31 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी झाडाला धडकल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 07:53 AM IST

काळाचा घाला! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

सातारा, 31 जुलै :  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (31 जुलै) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. गाडी झाडाला धडकल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी आहे. काशीळ गावाजवळील ही दुर्घटना आहे. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक मुलगा (अंदाजे साडेतीन वर्ष)आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन सौदागर असं कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे नाव आहे. तसंच हे सर्वजण कर्नाटकातील धारवाडचे रहिवासी होते. हा अपघात  बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला आहे.

(पाहा : शरद पवारांच्या 'त्या' निर्णयाला केला होता विरोध, आव्हाडांची UNCUT मुलाखत)

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात, 3 मित्रांना ट्रकनं चिरडलं

दरम्यान, 22 जुलै रोजी पुणे-सातारा महामार्गावर शिवापूर फाट्याजवळही भीषण अपघात झाला होता. दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तीन जणांनी जागीच जीव सोडला होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते. 22 जुलैला रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.

मित्राच्या वाढदिवशी काळाचा घाला

Loading...

आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करायला तळजाई टेकडीवर हे तीन तरूण गेले होते. यानंतर हे तिघंही शिवापूर येथे दर्ग्याच्या दर्शनाला निघाले. प्रवासादरम्यान त्यांची दुचाकी शिवापूर फाट्याजवळ आल्यानंतर हा अपघात घडला. कोंढणपूरजवळ या तिघांनाही ट्रकनं चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

(वाचा संतापजनक : शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीचं अपहरण करून बलात्कार)

दरम्यान, 20 जुलै रोजी महाराष्ट्रातही भीषण अपघात झाला होता.  पुणे-सोलापूर महामार्गावर कदम वाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात पुण्यातील 9 महाविद्यालयीन विद्यार्थी मृत्युमुखी पडले.  वीक एंडनिमित्त सर्वजण पावसाळी पिकनिकसाठी रायगडवर निघाले होते. यावेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला. कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.

(वाचा :भिवंडीत रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा , दोन डॉक्टरांना मारहाण)

घाटात जोरदार पावसात 'डेंजर ड्रायव्हिंग'चा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 06:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...