सातारा लोकसभा निवडणूक : उदयनराजे हॅटट्रिक करणार का?

उदयनराजे भोसलेंनी 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुका जिंकल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघावर उदयनराजे भोसले यांचं अनेक वर्षं वर्चस्व आहे. उदयनराजे भोसले यांना माागच्या वेळी 5 लाख 22 हजार 531 मतं मिळाली होती.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 02:03 PM IST

सातारा लोकसभा निवडणूक : उदयनराजे हॅटट्रिक करणार का?

सातारा, 10 मे : साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात ही लढत होती. याच मतदारसंघात बसपा आणि वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभे केले होते. तरीही मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्येच होती.

उदयनराजे भोसलेंनी 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुका जिंकल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघावर उदयनराजे भोसले यांचं अनेक वर्षं वर्चस्व आहे. उदयनराजे हे शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज असल्याने त्यांच्याकडे छत्रपती ही पारंपरिक उपाधी आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा

निवडणुकांच्या आधी मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांमुळे सातारा मतदारसंघ गाजला होता. या मतदारसंघावर अनेक वर्षं काँग्रेसचा कब्जा होता. 1951 च्या निवडणुकीत दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा या दोन जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. 1957 च्या निवडणुकीत इथे सीपीआय ला विजय मिळाला होता. त्यावेळी इथे क्रांतीसिंह नाना पाटील हे खासदार म्हणून निवडून आले.

यशवंतरावर चव्हाण हेही खासदार

Loading...

याच मतदारसंघातून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही खासदार झाले. भाजप सोडून जवळपास सगळ्या प्रमुख पक्षांचे उमेदवार इथून खासदार झाले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, सीपीआय यांचा समावेश आहे.

2009 मध्ये मध्ये उदयनराजे भोसले खासदार झाले. त्यानंतर त्यांचा दबदबा तिथे कायम होता. सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, उत्तर कराड, दक्षिण कराड, सातारा आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

मागच्या वेळी उदयनराजेंना जोरदार मताधिक्य

मागच्या वेळी मोदी लाटेतही उदयनराजे भोसले यांनी जोरदार विजय मिळवला होता. उदयनराजे भोसले यांना 5 लाख 22 हजार 531 मतं मिळाली होती. दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव होते. त्यांना 1 लाख 55 हजार 937 मतं मिळाली होती.

==================================================================================

SPECIAL REPORT: पवारांचा किल्ला ढासळणार की मजबूत होणार? हे समीकरण ठरवणार बारामतीचा खासदार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 03:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...