S M L

काँग्रेसच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा उद्या भाजप प्रवेश, माढ्याची उमेदवारीही मिळणार?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Updated On: Mar 24, 2019 11:33 AM IST

काँग्रेसच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा उद्या भाजप प्रवेश, माढ्याची उमेदवारीही मिळणार?

सातारा, 24 मार्च : सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती मिळाली आहे. तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीही भाजपकडून रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच काहींनी भाजप तर काहींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षबदलामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

माढ्याची उमेदवारी आणि भाजप


रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचं पारडं जड होताना दिसताच शरद पवारांनी पुन्हा एकदा जोरदारी हालचाली करत माढ्याचा उमेदवार निश्चित केला आणि पुन्हा एकदा पारडं फिरताना दिसत आहे.

शरद पवारांनी डाव टाकत माढ्यातून संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मग भाजपकडून रणजितसिंह यांच्याऐवजी रोहन देशमुख यांचा उमेदारीसाठी विचार केला जात असल्याची चर्चा होती. पण त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव चर्चेत आलं आहे.


Loading...

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 11:33 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close