Elec-widget

दारूच्या नशेत चालकाने वाढदिवसाचा फ्लेक्स लावणाऱ्या पाचजणांना उडवले

दारूच्या नशेत चालकाने वाढदिवसाचा फ्लेक्स लावणाऱ्या पाचजणांना उडवले

साहिल दिनकर निवडुंगे या १९ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु झाला

  • Share this:

सातारा, ०६ ऑक्टोबर २०१८- दारुच्या नशेत कार चालकाने रस्त्याशेजारी वाढदिवसाचा फ्लेक्स लावत असलेल्या पाचजणांना उडविले आहे. अडुळपेठ तालुका पाटण येथे रात्री ११ वाजता ही घटना घडली. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे आणि चालकाला वेळीच नियंत्रण राखता न आल्यामुळे पाचजणापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर उरलेले तीनजण किरकोळ जखमी झाले.

साहिल दिनकर निवडुंगे असे अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव असून, जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कराड- चिपळुण महामार्गालत २० फूट अंतरावर अडुळपेठ येथे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान जवळपास २० ते २५ जण मित्राच्या वाढदिवसाचा फ्लेक्स लावत होते. त्यावेळी नवारस्त्याहून पाटणकडे येणाऱ्या तवेरा या कारमधील चालकाने दारुच्या नशेत या तरुणांच्या आंगावर गाडी घातली. यामध्ये पाचजण जख्मी झाले.

जखमींना तात्काळ कराय येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे या १९ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यु झाला. तवेरा चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पाटण पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कारवाई होत आहे.

 

गडकरी म्हणतात, 'पवारसाहेब कधी काय बोलतील आणि काय करतील याचा नेम नाही'

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...