आरवडे ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित संरपंचांनाच मारहाण

युवराज पाटील असं या नवनिर्वाचित सरपंचांचं नाव आहे. सरपंचांना निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर मारहाण करण्यात आली आहे.युवराज पाटील हे शासकीय रूग्णालयात उपस्थित असताना त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रूग्णालयात घुसून बेदम मारहाण केली आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2017 05:04 PM IST

आरवडे ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित संरपंचांनाच मारहाण

आरवडे,18 ऑक्टोबर: ग्राम पंचायतींच्या निवडणुकांनंतर आता एका नवनिर्वाचित सरपंचांनाच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना घडले आहे.सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात ही घटना घडली आहे.

युवराज पाटील असं या नवनिर्वाचित सरपंचांचं नाव आहे. सरपंचांना निवडणुकीचे निकाल लागल्या नंतर मारहाण करण्यात आली आहे.युवराज पाटील हे शासकीय रूग्णालयात उपस्थित असताना त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रूग्णालयात घुसून बेदम मारहाण केली आहे. युवराज पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला होता.या घटनेमुळे तासगाव तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान ग्राम पंचायतीच्या दोन्ही चरणात निवडणुका पूर्ण झाल्या असून अनेक ग्राम पंचायतींमध्ये भाजप पुरस्कृत सरपंचांची सरशी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2017 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...