S M L

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम !

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय.

Chandrakant Funde | Updated On: Sep 25, 2017 06:24 PM IST

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम !

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स आजही कायम आहे. नारायण राणे आज अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले असतानाच महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी या भेटीचा राणेंच्या पक्ष प्रवेशासाठी संबंध जोडू नका, असं बुचकाळ्यात टाकणारं विधान केलंय. राणे आणि अमित शहांची ही भेट सहज आणि स्वाभाविक आहे, राणेंच्या मुलांबाबतही पक्षाने अजून कुठलाही विचार केलेला नाहीय, भाजप आपल्या तत्वानुसार चालेल, असंही पांडे म्हणाल्या.

दरम्यान, नारायण राणेंनी देखील दिल्लीला जाण्यापूर्वीच आपण कुडाळमधल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी अमित शहांना भेटत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे नारायण राणेंचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार भाजप राणेंना प्रवेश देताना त्यांच्या मुलांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत कुठलंही ठोस आश्वासन देऊ इच्छित नाहीये. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही नारायण राणेही भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत भाग असणार नसल्याचं विधान केलंय. तर मुख्यमंत्रीही उद्यापासून विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. त्यामुळे अमित शहा काय भूमिका घेतात त्यावर नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 06:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close