महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.. असं म्हणत संजय राऊतांनी दिले हे संकेत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2019 02:21 PM IST

महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.. असं म्हणत संजय राऊतांनी दिले हे संकेत

मुंबई, 13 जून- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज (13 जून) वाढदिवस आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना फेसबुकच्या माध्यमातून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. राऊत यांना आदित्य यांना गळाभेटीचा एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. 'महाराष्ट्र खरंच तुझी वाट बघत आहे.' असं फोटोच्या खाली कॅप्शन दिले आहे. राऊत यांन जणू आदित्य ठाकरे येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेतच दिले आहेत.

दरम्यान,  शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही.  आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की नाही, याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, असे शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांनी बुधवारी सांगितले होते.



महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. आदित्य ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढू शकतात, असे संकेत राऊत यांनी दिले आहेत. राऊत यांनी सांगितले की, 28 वर्षीय आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत सक्रीय सहभाग घेतला आहे. आजोबा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या शिवसेनेला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आदित्य परिश्रम घेत आहेत.

Loading...

ठाकरे घराण्यातील सदस्य कायम प्रमुख असतो..

भाजप-शिवसेनेची सत्ता राज्यात कायम ठेवण्याच्या दिशेने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनविण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, ठाकरे उपपद घेत नाहीत. ठाकरे घराण्यातील सदस्य कायम प्रमुख असतो. ठाकरे घराण्याची राज्य तसेच देशाच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे.

काय आहे भाजपचा नवा प्लान..

आदित्य ठाकरे असं म्हणत असले तरी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता शिवसेना – भाजप युतीत जागा वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे. लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मित्रपक्षांना जागा सोडून 50-50चा फॉर्म्युला हा ठरलेला आहे. पण भाजपने मात्र आता नवा प्लॅन केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचं विधान

यानुसार भाजप-शिवसेना135–135जागांवर लढतील. तर, मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार असून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून युतीत ठिणगी पडली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये मतभेद नाहीत

महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याबरोबरच शिवसेना - भाजप युतीमध्येही काही मुद्द्यांवर संघर्ष झाल्याचं समोर येत आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय प्रदूषण घालवलं, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुतीही केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी करार

शिवसेना - भाजपमध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी 144 -144 असा फॉर्म्युला ठरलेला होता. पण, चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पण, शिवसेना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असून त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या कराराची आठवण करू दिली जाणार आहे.

ऑक्टोबरमध्ये निवडणुका

लोकसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी आणि उद्धव ठाकरे ठरवू तो निर्णय अंतिम असेल असं म्हटलं होतं. पण, आता भाजपमधील मंत्र्यांनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असून शिवसेना – भाजपनं युतीचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काय म्हणाले आदित्य ठाकरे? पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 02:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...