News18 Lokmat

सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही -संजय राऊत

कधी गळा आवळायची भाषा तर कधी राजीनामे खिशात असल्याची धमकी...सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेनं विरोधकांची भूमिका वठवलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2017 06:57 PM IST

सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही -संजय राऊत

 प्रफुल्ल साळुंखे आणि वैभव सोनवणे, मुंबई

07 जून : या सरकारचा गळा दाबायला वेळ लागणार नाही फक्त काही दिवस थांबा असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

कधी गळा आवळायची भाषा तर कधी राजीनामे खिशात असल्याची धमकी...सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेनं विरोधकांची भूमिका वठवलीये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्दायवर

मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच सेनेनं बहिष्कार टाकला. पण सेना ज्याला बहिष्कार म्हणतेय. त्याला भाजपनं अनुपस्थिती म्हटलंय.

शिवसेना वाघ आहे की हतबल तेही कळत नाहीये. संजय राऊत गळा आवळायची भाषा करत आहे. आमचा शेतकरी जर मरत असेल तर सत्ता काय कामाची ?, जर सरकारचा गळा दाबायचा असेल तर वेळ लागणार नाही. तुम्ही फक्त काही दिवस थांबा उद्धव ठाकरे काहीतरी निर्णय घेतील असा इशाराही राऊतांनी दिला.

Loading...

तर दुसरीकडे शिवसेननं इशारा देणं थांबवून काय ते एकदाच ठरवावं अशी मागणी आता लोक करू लागलेत.

शिवसेनेनं इतक्यावेळा इशारा दिलाय की, आता त्यांची परिस्थिती लांडगा आला रे...सारखी झालीये. दुसरीकडे शिवसेनेच्या विरोधाला आणि धमकीला आता भाजपही वैतागल्याची चर्चा आहे. गरज पडलीतर मध्यावधी निवडणुकीची भाजपची तयारी असल्याची चर्चा आहे. भाजप-सेना वादाचा हा शेवटचा अध्याय म्हटलंतरी वावग ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...