S M L

बुलेट ट्रेनवर खर्च करताय मग अराजकता निर्माण होणार नाही का ?-संजय राऊत

आता राज्य सरकार ३५ हजार कोटी रुपये देणार आहेत, मग अराजकता निर्माण होणार नाही का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2017 08:32 PM IST

बुलेट ट्रेनवर खर्च करताय मग अराजकता निर्माण होणार नाही का ?-संजय राऊत

14 सप्टेंबर : बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटींच्या वर सरकार खर्च करतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकारने नकार दिला होता. आता राज्य सरकार ३५ हजार कोटी रुपये देणार आहेत, मग अराजकता निर्माण होणार नाही का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

अहमदाबादमध्ये देशाच्या पहिल्या वहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपला टार्गेट करत बुलेट ट्रेन प्रकल्पावरून टीकास्त्रं सोडलं. सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीये.

बुलेट ट्रेनचा विचार करताना आमचा विरोध नाही. मात्र पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेणार आहेत का ?, आमच्या शेतकऱ्यांचे भले करायचे नाही का? तुम्हाला महाराष्ट्र लुटायचे आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.बुलेट ट्रेन पेक्षा मुंबईतील ट्रेनचा विचार करा. आजही रेल्वेमुळे लोकांचे जीव जातायत. मुंबईचे महत्त्व कमी करणारे आजपर्यंत संपले आहेत. हा इतिहास आहे.’मुंबईतला लढवय्या माणूस मुंबईचे महत्त्व कमी होऊ देणार नाही असा इशाराही राऊत यांनी दिला.

आम्हाला अहमदाबाद–मुंबई पेक्षा आम्हाला औरंगाबाद-मुंबई बुलेट ट्रेन पाहिजे, नागपूर, जळगाव मुंबई पाहिजे अशी मागणीही राऊत यांनी केली. तसंच बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. त्यामुळे आम्हाला वाटलं पाकव्याप्त काश्मीरपर्यंत ही बुलेट ट्रेन जाईल असा टोलाही राऊतांनी लगावला.

राज्यातील सरकार संपूर्ण राजकारणात अडकले आहे. लोडशेडिंगचा विषय या लोकांना कळत नाही. मागच्या सरकारच्या काळात हीच लोकं आंदोलन करीत होती. लोडशेडींग विरोधात

Loading...

ऊर्जामंत्र्यांच्या कार्यक्रमाला वीज चोरी करतात मग सर्वसामान्यांना कशाला दोषी धरता असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2017 08:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close