'भाजप आमच्यावर एकतर्फी प्रेम करतं'

शिवसेना आणि भाजप युतीच्या अनेक फॉर्मुल्यांचीही सध्या चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी युतीवर हे मिश्किल भाष्य केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 23, 2018 11:53 AM IST

'भाजप आमच्यावर एकतर्फी प्रेम करतं'

पंढरपूर, 23 डिसेंबर : 'भाजपचं शिवसेनेवर एकतर्फी प्रेम असून ते आमच्यावर लादलं जात आहे,' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप युतीच्या अनेक फॉर्मुल्यांचीही सध्या चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी युतीवर हे मिश्किल भाष्य केलं आहे.

'न्यूज18 लोकमत'सोबत बोलताना शिवसेनेनं पहिल्यांदाच युतीच्या चर्चांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युतीबद्दल वक्तव्य केलं. त्यानंतर शिवसेनेनं 50-50 चा फॉर्मुला दिला.

शिवसेनेनं युती करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाची अट ठेवल्याचा दावाही भाजपच्या एका माजी मंत्र्यानं केला आहे. त्यामुळे युतीची बोलणी कितपत पुढे जाणार, हे पाहावं लागेल.

दरम्यान, उद्धव ठाकरे 24 तारखेला पंढरपुरात सभा घेणार आहेत. त्यासाठी पंढरपुरात जय्यत तयारी सुरु आहे. पंढरपूर शहरचं नव्हे तर पंढरपूरकडे येणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मार्गावरील हॉटेल, लॉज, धर्मशाळा आणि विश्रामगृह हाऊसफुल्ल झाली आहेत.

24 डिसेंबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या महासभेचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहचले असून चंद्रभागा नदीच्या तीरावरील ही महासभा ऐतिहासिक करण्यासाठी शिवसेना नेते तयारी करत आहेत. यामध्ये खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार तानाजी सावंत, शिवाजी सावंत हे पंढरपुरात तळ ठोकून आहेत.

Loading...


VIDEO: पहिल्याच लढतीत अभिजीत कटकेने मैदान मारलं, चित्तथरारक लढतीत विजय


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2018 11:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...