आगामी लोकसभा निवडणूक मीच लढवणार, संजय काकडेंचा दावा

आगामी लोकसभा निवडणूक मीच लढवणार, संजय काकडेंचा दावा

तर काकडे यांच्या दावेदारीवर भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सावध पवित्रा घातलाय.

  • Share this:

पुणे, 05 मे : 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीही शड्डू ठोकून लोकसभेसाठी आपण दावेदार असल्याचं जाहीर केलंय.

पुण्यात काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त संजय काकडे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तर रामदास आठवले यांचीही त्यांनी भेट घेतली आणि आपण तयारीला लागल्याचं दाखवून दिलंय.

तर काकडे यांच्या दावेदारीवर भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी सावध पवित्रा घातलाय. आपण 2019 करता उत्सुक आहोत. मात्र आपण पक्षाचे सैनिक आहोत. पक्ष जो निर्णय घेईल ता मान्य असेल अशी प्रतिक्रीया त्यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2018 05:03 PM IST

ताज्या बातम्या