News18 Lokmat

भिडे आणि एकबोटेंना अटक करा, सांगलीत आरपीआयचा मोर्चा

या मोर्चात विविध धर्मातील समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2018 05:26 PM IST

भिडे आणि एकबोटेंना अटक करा, सांगलीत आरपीआयचा मोर्चा

08 जानेवारी : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी सांगलीमध्ये आरपीआयने मोर्चा काढला होता.

आज दुपारी 12 च्या सुमारास सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांती सिह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मोर्च्याला सुरुवात झाली होती. तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला आणि तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगता झाली.

भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशी करण्यासाठी त्वरित न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी आणि ही चौकशी एका महिन्यात पूर्ण करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलीये. या मोर्चात विविध धर्मातील समाज बांधव सहभागी झाले होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 05:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...