'सत्तेतून पळून गेलेले आज दगड मारण्याचे काम करताहेत'

'सत्तेतून पळून गेलेले आज दगड मारण्याचे काम करताहेत'

दूध दरावरून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

सांगली, 30 सप्टेंबर : दूध दरावरून कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सत्तेतून पळून गेलेले आज दगड मारण्याचे काम करताहेत. कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि लोकसभा आली की अशी वावटळं उठतात असा टोला खोत यांनी लगावलाय.

दूध दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारात मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय. राज्य सरकारकडून दूध उत्पादकांसाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचे अनुदान अद्याप जमा झाले नसल्याने राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

यावर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. प्रत्येकाला काम नेमून दिलेलं असतं. पण काही माणसांना वेश दिसत नाही. कारण एखाद्या व्यवस्थेमध्ये गेलं की तिथे राहून काम करायचं असतं, पळून जाऊन लांब राहून दगड मारणं सोपं असतं असा टोला कृषी राज्यमंत्र्यांनी शेट्टी यांना लगावलाय.

तसेच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून आज जे बसले आहेत, ते लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या की असे वावटळ उठतात असा टोलाही खोत यांनी खासदार शेट्टी यांच्या इशारावर लगावलाय. त्याच बरोबर दूध दर अनुदानाबाबत ज्या संस्थांची तपासणी झाली आहे. त्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान वर्ग होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

VIDEO : पालिकेचं कामकाज पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच नगरसेवकांचा राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 01:39 PM IST

ताज्या बातम्या